ठाणे महापालिकेच्या दिमतीला गुजरात पासिंगच्या गाड्या? जितेंद्र आव्हाडांनी फोटो शेअर करत केला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज एक फोटो शेअर करत मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी ठाणे महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीचा फोटो शेअर केला आहे. ही गाडी चक्क गुजरात पासिंगची आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे.

”ठाणे महापालिकेच्या दिमतीला,गुजरात पासिंगच्या गाड्या. हे काय गौडबंगाल आहे नेमक?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महानगरपालिकेला केला आहे. त्यांनी सोबत कचऱ्याच्या गाडीचा फोटो शेअर केला आहे.