निसर्ग आणि आरोग्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. जितेंद्र घोसाळकर, आयुर्वेद तज्ञ

उद्या जागतिक पर्यावरणदिन. निसर्गाशी आपले नाते खूप पुरातन… प्राचीन. निसर्ग नेहमीच आपल्याला भरभरून आरोग्यदान देत असतो. फक्त ते घेता यायला हवे.

निसर्ग हा देवाने बनवलेला आहे. तो आपल्या आरोग्याला पोषक कसा ठरेल हेही त्यानेच ठरवलेले आहे. पूर्वी जेव्हा फारसं प्रदूषण नव्हतं तेव्हा लोक आजच्या तुलनेत जास्त तंदुरुस्त होते. कारण त्यावेळी त्यांना बहुतांश अन्न हे निसर्गाकडूनच मिळत होतं. लोक त्यावेळी सेंद्रिय पद्धतीने शेती करायचे. या पद्धतीने केलेल्या शेतीतूनच अन्न मिळायचे. पण आता माणसाने निसर्ग नियमांमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रदूषणयुक्त रासायनिक शेती व्हायला लागली. त्यामुळे जमिनीचा स्तर खराब होऊ लागला. त्यामुळे जमिनीतून मिळणारी पोषक द्रव्ये, खनिजे आपल्याला मिळत नाही. केळ्याचंच उदाहरण घ्यायचं तर नैसर्गिक पद्धतीने झाडाला आलेली केळी १० ते १५ दिवस टिकायची. आता बाजारातून आणलेले केळे दुसऱया दिवशी काळे होऊन तिसऱया दिवशी त्याचं पाणी होऊन जातं. हा माणसाचाच दोष आहे.

सर्व होणारे संसर्गजन्य आजार हेही निसर्गातील बदलामुळेच होतात. कारण निसर्गापासून मिळणाऱया अन्नधान्यातून आपल्या शरीराला पोषक द्रव्ये आता आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती ढासळत चालली आहे. त्यामुळे डी-जनरेटिव्ह आजार बळावले आहेत. म्हणजे शरीराचा ऱहास होऊन वातावरणातील बाधक घटक द्रव्यामुळे होणारे आजार. अशा आजारांचे प्रमाण आता वाढले आहे. या सगळ्याला एकमेव कारण म्हणजे निसर्गाचा होणारा ऱ्हास.

निसर्गाच्या ऱ्हासामुळे पाण्याचे प्रदूषणही वाढले आहे. पाण्यात वेगवेगळ्या प्रकारची रसायने फवारली जातात. कंपन्यांमधून होणारे रासायनिक द्रव्यांचे सांडपाणी सोडले जाते. अनेक घातक वायू कंपन्यांकडून निसर्गात सोडले जात आहेत. ते वायू श्वासातून शरीरात जातात. म्हणून आपण वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहोत.

हे लक्षात ठेवाच?

> शक्य असल्यास चांगल्या प्रतीचे पाण्याचे फिल्टर वापरा. शुद्ध केलेलं पाणी झाकून ठेवा.

> पिण्याचं पाणी घेण्यासाठी तुम्ही जी भांडी वापराल ती स्वच्छ असल्याची खबरदारी घ्या. पाण्याची भांडी हाताळताना हात स्वच्छ असले पाहिजेत. पिण्याच्या पाण्यात हात बुडवू नका.

> भाजी पिकवताना खतं वापरली जातात. त्यामुळं ती बनवण्याआधी स्वच्छ धुवा. प्रत्येक पदार्थ बनवण्याआधी हात, विळी किंवा भाज्या चिरल्या जातात तो कटिंग बोर्ड, भांडी, किचन ओटा गरम साबणाच्या पाण्यानं धुवा.

> किचन ओटय़ाकर किंवा प्लेटमध्ये जर तुम्ही कच्ची अंडी, मटन किंवा मासे ठेवले असतील तर दुसरा कोणताही पदार्थ बनवण्याआधी तो ओटा किंवा ती प्लेट स्वच्छ धुऊन काढा. म्हणजे अन्न दूषित होण्याचं टाळता येईल.

> अन्न नीट शिजवा आणि काही पदार्थ लवकर खराब होतात. असे पदार्थ लगेच खाणार नसाल तर ते प्रिजमध्ये ठेवा. खराब होणारे पदार्थ दोन तासांपेक्षा जास्त केळ बाहेर ठेवू नका.

> पुरेशी झोप ही गरजेची आहे. त्यामुळे हृदय क रक्तवाहिनी निरोगी राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

काय टाळायचे…?

> आजच्या धकाधकीच्या जीवनात बाहेरचे खाणे टाळता येत नसले तरी मैद्यापासून बनवलेले पदार्थ टाळावेत ही एकच गोष्ट ध्यानात ठेवायची.

> चायनीज, जंक फूड, फास्ट फूड यात अजिनोमोटो या घटक द्रव्याचा भरपूर वापर केला जातो. हे घटक द्रव्य शरीराला खूप घातक आहेत. विशेष म्हणजे मेंदूचे विशिष्ट आजार या घटकामुळे होतात.

> जेवण बनवण्यासाठी ऍल्युमिनियमची भांडी वापरणे टाळता येऊ शकते. त्याऐवजी स्टील, तांब्याची, पितळेची भांडी वापरू शकाल.

> बदाम, डाळिंब, दूध, मांस, सोयाबीन असे उच्च प्रथिने देणारे पदार्थ आहारात असलीच पाहिजेत. त्यामुळे हाडांची होणारी झीज भरून निघते.

> रात्री झोपण्याआधी पोट गच्च होईल इतकं जेकू नका. चहा-कॉफीसारखे कॅफेन असलेली प्येये आणि मद्य घेण्याचं टाळा.