हॅरी पॉटरच्या लेखिकेला ट्रान्सजेंडरकडून बलात्कार व जीवे मारण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॅरी पॉटर या सुपरहिट चित्रपटांच्या मालिकेच्या लेखिका जेके रोलिंग यांना ट्रान्सजेंडरकडून बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. रोलिंगच्या सोशल मीडियावर ट्रान्सजेंडर व्यक्ती तुटून पडल्या असून तिच्या पोस्टवर तिला वेगवेगळ्या धमक्या दिल्या जात आहेत. रोलिंगने तिच्या वेबसाईटवरून याबाबत सांगत तिला आलेल्या धमक्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहे.

जून महिन्यात रोलिंगने ट्रान्सजेंडर व्यक्तींबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. अनेकांनी तिच्यावर टीका केलेली. त्यानंतर रोलिंगने तिच्या वेबसाईटवरून तिचे मत मांडले आहे. ”माझ्या त्या वक्तव्यानंतर लोकं मला ट्रान्सफोबिक समजू लागले आहेत. मी त्या समाजातील लोकांना नुकसान पोहोचवू शकते असे त्यांचे मत झाले आहे. मात्र ट्रान्सजेंडर समाजासाठी मी बरेच वर्ष काम केले आहे. त्यांच्या हक्कांसाठी मी लढा दिला आहे. माझ्यावर होणारे हे आरोप अत्यंत चुकीचे आहेत. महिला अधिकारांसाठी आपलं मत मांडण म्हणजे ट्रान्सजेंडर समुदायाच्या विरोधात बोलणं असं होत नाही’, असे रोलिंगने तिच्या वेबसाईटवर लिहले आहे.