गोड बातमी! 8 हजार 868 जागांसाठी रेल्वेत भरती, 27 नोव्हेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख; बारावी आणि पदवीधर मुलांना नोकरीची संधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागात तब्बल 8 हजार 868 जागांची भरती करण्यात येत आहे. ही भरती बारावी आणि पदवीधर उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षांपर्यंत असायला हवे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे. पदवीधरासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2025, तर बारावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती रेल्वेची अधिकृत वेबसाईट https://www.rRmumbai.gov.in यावर देण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्जासोबत जनरल, ओबीसी, आर्थिक मागास वर्गासाठी 500 रुपये फी, तर एससी, एसटी, ईबीसी, ट्रान्सजेंडर, महिला वर्गांसाठी 250 रुपये फी भरावी लागणार आहे. या भरतीमध्ये एससी, एसटीतील वर्गांना वयामध्ये 5 वर्षे सूट, तर ओबीसी वर्गांतील उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात येणार आहे.

 पदवीधरांसाठी एकूण जागा

 पदाचे नाव                                 पद संख्या

चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर    161

स्टेशन मास्टर    615

गुड्स ट्रेन मॅनेजर    3416

ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टाइपिस्ट  921

सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट      638

बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी जागा

कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)  2424

अकाऊंट्स क्लर्क कम टाइपिस्ट 354

ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट  163

ट्रेन्स क्लर्क (लिपिक)  77

शैक्षणिक पात्रता

चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. स्टेशन मास्टर पदासाठी पदवीधर, गुड्स ट्रेन मॅनेजर पदासाठी पदवीधर, ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टाइपिस्ट पदासाठी पदवीधर आणि इंग्रजी व हिंदीत टायपिंग येणे आवश्यक आहे. सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्टपदासाठी पदवीधर आणि इंग्रजी व हिंदीत टायपिंग येणे आवश्यक आहे. सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट पदासाठी पदवीधर आणि इंग्रजी व हिंदीत टायपिंग येणे आवश्यक आहे. कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) पदासाठी 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण, अकाऊंट्स क्लर्क कम टाइपिस्ट पदासाठी बारावीत 50 टक्के गुणांसह इंग्रजी व हिंदीत टायपिंग येणे आवश्यक आहे. ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट पदासाठी बारावीत 50 टक्के गुणांसह इंग्रजी व हिंदीत टायपिंग येणे आवश्यक आहे. ट्रेन्स क्लर्क (लिपिक) पदासाठी 50 टक्क्यांसह बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे.  देशभरात सध्या बाराकी आणि पदकी मिळकलेले लाखो तरुण बेरोजगार आहेत. ते नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. या तरुणांसाठी रेल्केतील सरकारी नोकरी मिळकण्याची ही सुकर्णसंधी आहे.