G20 मध्ये मोदींसोबत मानवाधिकार, मुक्त पत्रकारितेच्या मुद्द्यांवर चर्चा! जो बायडेन यांची व्हिएतनाममधून विधान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी सांगितलं की त्यांनी दिल्लीतील G20 शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी मानवी हक्कांचा सन्मान, सुशिक्षित-सुसंस्कृत समाजाची भूमिका आणि भयमुक्त पत्रकारितासह विविध मुद्दे उपस्थित केले.

बायडन यांनी व्हिएतनाममधील पत्रकार परिषदेत हा दावा केला. दिल्लीतील G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते अधिकृत दौऱ्यावर आहेत.

‘मी नेहमीप्रमाणेच, मानवाधिकारांचा आदर करणं, सुशिक्षित-सुसंस्कृत समाजाची महत्त्वाची भूमिका आणि स्वतंत्र प्रेस यांचं एक मजबूत आणि समृद्ध देश निर्माण करण्याचे महत्त्व मोदींसमोर मांडलं. आम्ही खूप महत्त्वाची चर्चा केली आहे’, असं बायडेन यांनी हनोई मध्ये सांगितलं.

त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केल्यानं देशात वादळ उठलं आहे. पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर वर लिहिलं, ‘ना प्रेस कॉन्फरन्स करूंगा, ना करने दूंगा (पत्रकार परिषद घेणार नाही, तुम्हाला एकही ठेवू देणार नाही) याचा कोणताही फायदा झाला नाही’ (म्हणजे बायडेन बाहेर जाऊन त्यांना जे बोलायचे होते ते बोललेच).

‘मानवाधिकार, सुसंस्कृत-सुशिक्षित समाजाच्या भूमिका आणि प्रेसचं स्वातंत्र्य… बायडेन व्हिएतनाममध्ये तेच बोलत आहेत जे त्यांनी हिंदुस्थानात त्यांनी मोदींच्या तोंडावर सांगितलं होतं’, असं जयराम रमेश म्हणाले.

याआधी रमेश यांनी आरोप केला होता की, दिल्लीतील द्विपक्षीय बैठकीनंतर बायडेन यांच्या टीमला मीडियाशी संवाद साधण्याची आणि पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली नाही.