
इस्रायल अणि पॅलेस्टाईनचे गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीय. तर गाझाकडून आलेल्या रॉकेटस हल्ल्यानंतर इस्रायलनेही त्याला चोख प्रतिउत्तर देत युद्धाला सुरुवात केली. आता इस्रायलने मंगळवारी गाझा रुग्णालयावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात 500 लोकं मारली गेली आहेत.त्यामुळे अनेक देश इस्रायवर संतापले आहेत. एवढेच नव्हे तर इस्रायलला पाठिंबा देत असलेल्या अमेरीकेनेही या हल्ल्याबाबत खेद व्यक्त केला आहे. सुरक्षा सल्लागारांनी याप्रकरणाची अधिक माहिती मिळवण्यास सांगितली आहे.
अमेरीकेचे राष्ट्रपती जो बायडेन आज इस्रायलला पोहोचणार आङेत. इस्रायलच्या दौऱ्यासाठी निघालेले जो बायडेन म्हणाले, गाझाच्या अल-अहली अरब रुग्णालयावर केलेला बॉम्बहल्ल्यात जीवित आणि मालमत्तेची भीषण हानी झाल्यामुळे माझा खूप संताप होतोय आणि खेदही वाटत आहे. हमासने गाझा रुग्णालयावरील हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. तर इस्रायलचा दावा आहे की, त्यांच्याकडून हा हल्ला झालेला नसून हा हमासने केलेल्या चुकीच्या फायरचा परिणाम आहे.
जो बायडेन म्हणाले, जेव्हा त्यांनी गाझा रुग्णालयावर बॉम्बहल्ल्याची बातमी पाहीली त्यावेळी त्यांनी तत्काळ जॉर्डनचे राजा अब्दुल्ला द्वितीय आणि इस्रायलचे पंचप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाला निर्देश दिले की, त्यांनी नेमके काय झाले याबाबत माहिती गोळा करण्यास सांगितले. जो बायडन म्हणाले, संघर्षाच्या काळात अमेरिका लोकांच्या जीवाच्या रक्षणासाठी उभे आहे. त्यांनी या हल्ल्यात मारले गेलेले आणि जखमी झालेल्या रुग्ण, चिकितिसक कर्मचारी आणि अनेक निरपराधांना खेद व्यक्त केला आहे. बायडेन इस्रायलनंतर जॉर्डनलाही जाणार होते. मात्र गाझा रुग्णालयात झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला. गाझाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रुग्णालयावर हल्ला इस्रायलने केला आहे आणि या हल्ल्यात अनेक रुग्ण मारले गेले आहेत.


























































