धडकी भरकणारा ‘जजमेंट’ चा ट्रेलर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शननिर्मित ‘जजमेंट’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या थरारक ट्रेलरच्या प्रदर्शनामुळे प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता आणखीनच वाढली आहे. अस्तित्वाच्या लढाईसाठी ‘तिच्या’ जीवघेण्या संघर्षाचे भेदक चित्रण या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे.

या चित्रपटात तेजश्री प्रधान, मंगेश देसाई, श्वेता पगार, माधव अभ्यंकर, सतीश सलागरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे निर्माता डॉ. प्रल्हाद खंदारे आणि सह निर्माता हर्षमोहन कृष्णात्रेय आहे. समीर सुर्वे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’ या कादंबरीवर आधारित आहे.