Junior Hocky world cup : कॅनडाचा धुव्वा उडवत हिंदुस्थान उपांत्यपूर्व फेरीत

स्पेनविरुद्धच्या धक्कादायक पराभवानंतर खवळलेल्या हिंदुस्थानने कॅनडाचा 10-1 गोल फरकाने धुव्वा उडवित पुरष ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पडक दिली हिंदुस्थान ‘क’ गटात दूसरा क्रमांक मिळवित स्पर्धेत आगेकूच केली. आता मंगळवारी उंपात्यपुर्व लढतीत हिंदुस्थानपुढे ‘ड’ गटातील नेदरलॅणड्सचे आव्हान असेल.

हिंदुस्थानकडून आदित्य अर्जुन लालगे (8व्या व 43व्या मिनटाला), रोहित (12 व्या व 55 मिनिटाला), अमनदीप लाकड़ा (23 व्या व 52 व्या मिनिटाला), विष्णुकांत (42 व्या मिनिटाला), राजिंदर (42व्या मिनिटाला), कुशवाह सौरभ आनंद (51 मिनिटाला) व उत्तम सिंह (58 व्या मिनिटाला) यांनी गोल केले. कॅनडाकडून जूड निकोल्सनने 20 व्या मिनिटाला आपल्या संघासाठीचा एकमेव गोल केला.

सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतलेल्या हिंदुस्थानसाठी आदित्य बलनेने 8व्या मिनिटाला मैदानी गोल करीत आपल्या संघाचे खाते उघडले. त्यानंतर रोहितने पेनल्टीवर गोल करीत हिंदुस्थानची आघाडी 2-0 ने वाढवली. मात्र, पुढच्याच मिनिटाला अमनदीपने पेनल्टीवर गोल करीत हिंदुस्थानची आघाडी 3-1 अशी केली. मध्यंतरानंतर हिंदुस्थानी खेळाडूं‌नी दोन मिनिटांत ३ गोल करीत कॅनडाच्या खेळाडूंना निष्प्रभ केले. विष्णुकांतने मैदानी गोल केला, तर राजिंदर व लालगे यांनी गोल करीत हिंदुस्थानची आघाडी 6-1 अशी आणखी भक्कम केले,

अखेरच्या क्वॉर्टरमध्ये 4 गोल

पहिल्या तिन्ही क्वॉर्टरमध्ये वर्चस्व गाजविल्याने हुरूप वाढलेल्या हिंदुस्थानी खेळाडूंनी अखेरच्या चौथ्या क्वॉर्टरमध्ये आणखी गोल केले. आनंद, लाकडा व रोहित यांनी लवकर लवकर गोल केले, तर कर्णधार उत्तम सिंहने अखेरची शिट्टी वाजण्याच्या दोन मिनिटे आधी गोल केला