गुरूच्या चंद्रावर दिसतेय पाण्याची वाफ, ‘युरोपा’बाबत नासाचे महत्त्वाचे संशोधन

687

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरू ग्रहाच्या चंद्राला ‘युरोपा’ असे म्हणतात. या युरोपावर पहिल्यांदा नासाच्या संशोधकांना बाष्प दिसले आहे. त्यामुळे युरोपावर मोठा समुद्र अस्तित्वात असून हा पाणीसाठा बर्फाच्या जाड थरांसाठी संरक्षित असल्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे.

नेचर ऍस्ट्रोनॉमी या जर्नलमध्ये गुरूच्या चंद्रावरील पाण्याचे संशोधन प्रकाशित झाले आहे. अमेरिकेच्या हवाई शहरातील डब्ल्यू. एम. केक ऑब्जर्व्हटरीमधून युरोपावरील वाफेच्या प्रमाणाचा अंदाज घेण्यात आला आहे. युरोपावर बर्फाळ पृष्ठभागावर पाणी असून कधी कधी फवाऱयांसारखे ते बाहेर येते. यासंदर्भात संशोधकांकडे पुरावे आहेत, मात्र पाण्याचे मोलेक्युल मोजून अद्यापपर्यंत कुणीही गुरूच्या चंद्रावर पाणी असल्याचे खात्रीने सांगू शकत नव्हते. नुकत्याच नासाने केलेल्या अभ्यासामुळे  संशोधकांना गुरूच्या आतील रचनेचा अभ्यास करणे सोपे होणार आहे असे नासाने म्हटले आहे. जीवसृष्टीसाठी आवश्यक घटक युरोपावर असल्याची शक्यता असल्याने संशोधकांना त्याचे आकर्षण वाटत असल्याचे नासाच्या गोड्डार स्पेस फ्लाइट सेंटरने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या