
ओठावर मिसरूडही न फुटलेल्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची बिहार रणजी संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. उपकर्णधारपदाकर पोहोचणारा तो सर्कात लहान खेळाडू ठरला आहे. रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामात बिहार संघाचा पहिला सामना 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
स्थानिक क्रिकेटमध्ये खेळाडूंचे मानधन त्यांच्या अनुभवाकर अवलंबून असते. बीसीसीआयच्या नियमानुसार 40 किंवा त्यापेक्षा जास्त रणजी सामने खेळलेल्या खेळाडूंना दिवसाला 60 हजार रुपये मिळतात. 21 ते 40 सामन्यांचा अनुभव असलेल्यांना 50 हजार रुपये, तर 0 ते 20 सामने खेळलेल्या खेळाडूंना दिवसाला 40 हजार रुपये मानधन दिले जाते.
राखीव (रिझर्क्ह) खेळाडूंना सुमारे 30 हजार रुपये मिळत असतात. वैभव सूर्यवंशीने बिहारकडून आतापर्यंत 5 फर्स्ट-क्लास सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याचा अनुभव 0 ते 20 सामन्यांच्या श्रेणीत मोडतो. या आधाराकर त्याला दिकसाला 40 हजार रुपये मानधन मिळू शकते. मात्र, एका अहकालानुसार आयपीएलमध्ये करारबद्ध असलेल्या खेळाडूंना रणजी ट्रॉफीमध्ये खेळल्यास किमान 20 लाख रुपये मिळतात. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचाही वार्षिक पगार या श्रेणीत म्हणजेच सुमारे 20 लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.