श्री चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ

न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर रिक्त जागेवर न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने घेतला. न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी 9 डिसेंबर 1993 रोजी दिल्ली स्टेट बार काwन्सिलमध्ये वकिली म्हणून नोंदणी केली असून दिल्लीमध्ये वकिलीची सुरुवात केली. 19 वर्षांच्या वकिलीच्या कारकीर्दीत, त्यांनी सुमारे 3,500 खटल्यांमध्ये फौजदारी आणि दिवाणी प्रकरणे हाताळली. 29 डिसेंबर 2023 ते 4 जुलै 2024 या कालावधीत झारखंड उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यभार सांभाळला. त्यानंतर त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले त्यानंतर आज शुक्रवारी राजभवन येथे त्यांनी मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली.