दहशतवाद्यांनी कारमधून सहा रॉकेटस् डागले, काबूल विमानतळावर पुन्हा दहशतवादी हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारीची डेडलाईन उद्या (दि. 31) संपत असून एक दिवस आधीच काबूल विमानतळावर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी विमानतळावर सहा रॉकेटस् डागली. अमेरिकेच्या डिफेन्स सिस्टीमने तत्काळ पाच रॉकेटस् निकामी केली. एक रॉकेट इमारतीवर जाऊन आदळले. या हल्ल्यात मुनष्यहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. हल्ल्यामागे इसिसच्या खुरासन गटाचे दहशतवादी असल्याचे समजते.

कारच्या डिक्कीत बसवले होते रॉकेट लाँचर
z टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार काबूल येथील खैर खाना परिसरातून एका कारमधून सहा रॉकेटस् विमानतळाच्या दिशेने डागण्यात आले. कारच्या डिक्कीत रॉकेट लाँचर बसविण्यात आले होते.
z सहापैकी पाच रॉकेट अमेरिकेच्या डिफेन्स सिस्टीमने तत्परतेने निकामी केले. एक रॉकेट इमारतीवर जाऊन आदळले. या हल्ल्यात अद्याप मृतांची माहिती नाही.

आज डेडलाइन संपणार; अमेरिकेचे एअर लिफ्ट सुरू राहणार का?

z अफगाणिस्तानातून अमेरिकेचे पूर्ण सैन्य 31 ऑगस्टपर्यंत माघारी घेतले जाईल, असे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी यापूर्वी जाहीर केले आहे.
z उद्यापर्यंत पूर्ण सैन्य माघारी जाईल का? ज्यांना देश सोडायचा आहे त्या अफगाणी नागरिकांच्या एअर लिफ्टचे काय? नागरिक विमानतळाबाहेर पडणार का? हे प्रश्न कायम आहेत.
z सध्या अमेरिकन सैन्याच्या ताब्यात काबूल विमानतळ आहे. मंगळवारी मध्यरात्री बारानंतर तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतरही एअर लिफ्टला परवानगी मिळणार का, याची चिंता आहे.