बाळाच्या डोळ्यात काजळ घालण्याविषयी गैरसमज !

पूर्वीच्या काळी लहान मुलांसाठी घरीच काजळ बनवले जात असे. छोट्याशा बाळाला आई दृष्ट लागू नये म्हणून तीट-टिळा लावून, त्याच्या डोळ्यात काजळ घालून सजवायची. आता मात्र डॉक्टर बाळाच्या डोळ्यात काजळ घालण्यास नकार देतात. कारण यामुळे बाळाला डोळे आणि त्वचेची अॅलर्जी होऊ शकते. बाळावर काजळाचा काय परिणाम होतो याची कारणे पाहूया ?

– बालकांचं शरीर अविकसित असतं. काजळ तयार करण्यासाठी पन्नास टक्के शिसे वापरले जाते. याचा बाळाच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो.

– घरी तयार केलेले काजळ नैसर्गिक घटकांनी बनवले जाते. त्यामुळे घरी बनवलेले काजळ वापर असे सांगितले जाते, मात्र हेही सुरक्षित नाही कारण काजळ बोटांनी लावले जाते. यामुळे बाळाला संसर्ग होण्याचा धोका असतो.

– बाळाच्या डोळ्यात काजळ घातल्याने डोळे मोठे होतात असा गैरसमजही आहे. डोळ्यात काजळ घातल्याने डोळे मोठे होत नाहीत.

– डोळ्यात काजळ घातल्याने बाळ बराच वेळ शांत झोपून राहते हा गैरसमज आहे. नैसर्गिकरित्या लहान मुलं 18 ते 19 तास झोपतात.

– काही वेळा सुंदर डोळ्यांकरिताही डोळ्यात काजळ घातले जाते, मात्र काजळामुळे डोळ्यांच्या मांसपेशीत बदल होत नाही. त्यामुळे कमी किंवा जास्त कसेही काजळ घातले तरी डोळ्यांच्या आकारात बदल होत नाही.

– काजळामुळे नकारात्मक शक्तींपासून रक्षण होते तसेच दृष्टी प्रभावित होते, असे म्हणतात. मात्र याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या