कळंब – नगराध्यक्षांसह त्यांचा पती, उपनगराध्यक्ष व तालुक्यातील 29 जणांचे रिपोर्ट पाझिटिव्ह

826

 

धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असुन शहरात आठ दिवसाचा कर्फ्यू चालु असतानाच नगराध्यक्ष, त्यांचे पती, उपनगराध्यक्ष असे एकाच दिवशी तालुक्यातील 29 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे.

शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढू लागल्याने 1 ऑगस्ट पासुन रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात येत आहेत. नगरपालीकेत आज नगराध्यक्षासह कर्मचाऱ्यांच्या 16 टेस्ट घेण्यात आल्या. यामधे नगराध्यशासह त्यांचे पती तसेच उपनगराध्यक्ष असे तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर तेरा जण निगेटिव्ह आले.

मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या क्लोज काँटक्ट मधील कळंब, येरमाळा, मस्सा, डिकसळ येथील चाळीस जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. याचा रिपोर्ट आज आला यामधे 26 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामध्ये शहरातील 7, येरमाळा 9, मस्सा (खं) 8 तर डिकसळ येथील 2 असे 26 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर 12 निगेटिव्ह दोन इनक्लिझीव्ह रिपोर्ट आले. यामुळे कळंब तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या