खेड- कळंबणी रुग्णालयातील सहाही जणांचे अहवाल निगेटिव्ह; आरोग्य यंत्रणेची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळंबणी रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांपैकी सहाजणांच्या स्वॅबचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याने खेडवासीयांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. पुणे आणि सौदी अरेबिया येथून खेडमध्ये आलेल्या दोघांसह अन्य चार जणांना सर्दी खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने त्यांना कळबंणी उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते.

परदेशातून खेड येथे आलेल्या एका व्यक्तिचा कोरोनाने मृत्यु झाल्याची घटना ८ एप्रिल रोजी घडली होती. या घटनेनंतर संपुर्ण तालुका हादरुन गेला होता. ही घटना संपुर्ण जिल्ह्याची झोप उडवणारी असल्याने महसुल, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा कमालीची सतर्क झाली होती. परदेशातून आल्यावर ती व्यक्ती ज्या गावात रहात होती त्या गावासह आजुबाजूची दोन गावे आणि शहरात त्याचा काही काळ बास्तव्य असलेला भाग पोलिसांनी सिल केला होता. या घटनेनंतर सतर्क झालेल्या आरोग्य यंत्रणेने गावागावात सर्वेक्षण सुरु केले होते. सर्दी खोकला किंवा तापाची लक्षणं आढळून येणाच्या रुग्णाला खबरदारीचा उपाय म्हणून कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरण करून ठेवले जात होते. 8 एप्रिलपासून या विलगीकरण कक्षात तब्बल ५१ जणांना विलगीकरण करून ठेवण्यात आले होते. यामध्ये मृत्यु पावलेल्या व्यक्तिचे जवळचे नातेवाईक, त्याच्यावर उपचार करणे खासगी डॉक्टर्स, तसेच त्याच्या रक्ताची तपासणी करणार्या लॅब टेक्नशियन यांचा समावेश होता.

कोरोनामुळे एका व्यक्तिचा झालेला मृत्यु आणि खबरदारी म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या 36 जणांचे केलेले विलगीकरण यामुळे खेड तालुक्यातील जनता प्रचंड तणावाखाली होती. विलगीकरण करून ठेवण्यात आलेल्या 36 जणांचे अहवाल काय येतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र सुदैवाने या सर्वाचाच अहवाल निगेटिव्ह आला आणि प्रचंड तणावाखाली असलेल्या तालुक्याला मोठा दिलासा मिळाला होता. यानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ज्यांना ज्यांना सर्दी खोकला किंवा कोरोना सदृश्य तापाची लक्षणं आढळून आली त्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी सहाजणांचे अहवाल आजपर्यंत प्राप्त झाले नसल्याने त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे की नाही हे स्पष्ट झाले नव्हते. आज सकाळी या सहाजणांचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले आणि खेड तालुका सद्यस्थितीत कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. सद्यस्थितीत एक रुग्ण कळंबणी येथील विलगीकरण कक्षात दाखल असून त्याचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात त्याचा अहवाल येईल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

यानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ज्यांना ज्यांना सर्दी खोकला किंवा कोरोना सदृश्य तापाची लक्षणं आढळून आली त्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी सहाजणांचे अहवाल आजपर्यंत प्राप्त झाले नसल्याने त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे की नाही हे स्पष्ट झाले नव्हते. आज सकाळी या सहाजणांचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले आणि खेड तालुका सद्यस्थितीत कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. सद्यस्थितीत एक रुग्ण कळंबणी येथील विलगीकरण कक्षात दाखल असून त्याचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात त्याचा अहवाल येईल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.