100 कलावंतांचे कलास्पंदन

इंडियन आर्ट प्रमोटर संस्थेतर्फे ‘कलास्पंदन कला महोत्सव – 2023’ हा भव्य कला महोत्सव 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर यादरम्यान वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. कला महोत्सवात 100 हून अधिक चित्रकार व शिल्पकार भाग घेणार असून त्यांच्या 1500 कलाकृतींचा समावेश असून कलारसिकांना ही पर्वणी आहे.

कला मेळाव्याचे उद्घाटन 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता कला आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. इंडियन आर्ट प्रमोटरने आयोजित केलेल्या  या कला महोत्सवात अनेक प्रथितयश तसेच समकालीन चित्रकार व शिल्पकार यांच्या तैलरंग, जलरंग, अक्रीलिक, चारकोल, मिक्स मीडियम, ब्रोंझ, धातुशिल्प वास्तववादी आणि निम्न वास्तववादी तसेच अमूर्त शैलीतील कलाकृती सादर होतील. प्रदर्शन दररोज 11 ते 7 या वेळेत रसिकांना विनामूल्य पाहता येईल.