
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपच्या कालिदास कोळंबकर यांची विधानसभा हंगामी अध्यक्षपदी नियुक्त केली आहे. कालिदास कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. आठ वेळा ते विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. बुधवारी होणाऱ्या Floor Test साठी विधानसभेचा हंगामी अध्यक्ष नियुक्त करणे अनिवार्य होते.
Maharashtra: BJP MLA Kalidas Kolambkar takes oath as Protem Speaker, at Raj Bhawan in Mumbai. Oath administered by Governor Bhagat Singh Koshyari pic.twitter.com/mSYjRXgmQk
— ANI (@ANI) November 26, 2019
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तापेचासंदर्भात महत्वाचा आदेश दिला. या आदेशामध्ये 27 नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजता Floor Test म्हणजेच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेचा हंगामी अध्यक्ष निवडला जाणे गरजेचे होते. कारण आमदारांना शपथ देणे तसेच बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया ही हंगामी अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच होणार आहे. यामुळे हंगामी अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर मंगळवारी सायंकाळी राज्यपालांनी कालिदास कोळंबकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्याल्यानंतर आता त्यांच्याकडे सगळे राजकीय पक्ष त्यांचा व्हीपची माहिती देतील.
BJP MLA Kalidas Kolambkar to be Protem Speaker, he will take oath shortly in Raj Bhawan. Kolambkar says ‘Oath of MLAs to be administered tomorrow when the session begins.’ #Maharashtra (file pic) pic.twitter.com/IGjvgI8NAI
— ANI (@ANI) November 26, 2019
काय आहे निकष?
परंपरेनुसार सदनाचा सर्वात ज्येष्ठ आमदार हा हंगामी अध्यक्ष बनत असतो. ज्येष्ठतेसाठीचा निकष हा वयानुसार नसून सर्वाधिक वेळा निवडून येणे हा असतो. सध्याच्या घडीला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपचे कालिदास कोळंबकर हे सर्वाधिक 8 वेळा निवडून आलेले आमदार आहेत. त्यामुळे कालिदास कोळंबकर यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद देण्यात आले आहे. हंगामी अध्यक्षाला पूर्ण वेळ अध्यक्षापेक्षा कमी अधिकार असतात, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जे अधिकार त्यांना मिळतात त्यावरून सत्तास्थापनेचा पेच सुटण्यास मदत होईल.


























































