
शुक्रवारी कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे पुन्हा 2 रुग्ण सापडले आहेत. त्यामूळे कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या एकूण रुग्णांचा आकडा 21 वर पोचला असून त्यापैकी 4 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
कल्याण पश्चिमेत 1 आणि डोंबिवली पूर्वेत 1 असे 2 कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली. त्यामूळे दिवसेंदिवस कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आतापर्यंत कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 21 रुग्ण आढळले असून त्यापैकी कल्याण शहरातील 8 तर डोंबिवलीतील तब्बल 13 जणांचा समावेश आहे.
कल्याण पश्चिमेत आढळून आलेला आजचा हा कोरोनाचा दुसरा रुग्ण आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने डोंबिवलीपाठोपाठ कल्याणातही खासगी वाहनांवर बंदी आणली आहे.




























































