पत्रीपुलावरून मार्चपासून सुपरफास्ट प्रवास, लाखो कल्याणकरांना मोठा दिलासा

526

प्रचंड वाहतूककोंडीने त्रस्त असलेल्या कल्याणकरांसाठी एक सुखद बातमी आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पत्रीपुलाचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होऊन मार्च महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलासाठी गर्डर तयार काम सध्या हैदराबाद येथे सुरू असून निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. सुरू असलेल्या कामाची पाहणी नुकतीच शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. दरम्यान वाहतूक सुविधा अधिक सुलभ व्हावी यासाठी पत्रीपुलाला समांतर तिसरा पूल तयार होत असून या पुलाच्या गार्डरचे कामही सुरू झाले आहे. हा पूल जूनपासून सुरू होईल.

हैदराबादमध्ये नेमके काय काम
पायलिंग आणि खांब उभारण्याचे काम प्रत्यक्ष जागेकर केगाने सुरू असून पुलाचा अत्यंत महत्त्काचा, केंद्रीय भाग असलेल्या गर्डरचे काम हैदराबाद येथी ग्लोबल स्टील कंपनी येथे सुरू आहे. कल्याणमधील ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक झाल्यामुळे 18 नोव्हेंबर 2018 रोजी तो पाडण्यात आला. कल्याण पूर्व- पश्चिम तसेच कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीला जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण होता. सध्या वाहतुकीचा संपूर्ण भार हा बाजूलाच असलेल्या नव्या पुलावर येत असून वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूककोंडीमुळे 15 मिनिटांच्या अंतरांसाठी दोन तास अडकून पडावे लागत असल्याने कल्याण-डोंबिवलीकर कमालीचे त्रासले आहेत.

शिवसेना नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्च 2020 पासून पत्रीपूल सुरू होईल, अशी स्पष्ट ग्वाही दिली होती. त्यामुळे पुलाच्या कामाला गती आली. रेल्वे मार्गावर हा पूल असल्याने पुढील 50 वर्षांचा विचार करून हैदराबाद येथे पुलाचे गर्डर बनवण्याचे काम सुरू आहे. शिवाय या पुलाला समांतर असा आणखी एक तिसरा पूलही राज्य रस्ते विकास महामंडळाने मंजूर केला असून त्याच्याही कामाला सुरुवात झाली आहे.

कल्याण दिशेला आठपैकी सहा खांब उभे राहिले असून डोंबिवली दिशेला सहापैकी चार खांबांचे काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत ही कामे आणि अप्रोच रस्त्याचे काम पूर्ण होईल आणि मग ओपन केब गर्डर टाकण्यात येऊन मार्च महिन्यात हा पूल प्रवासी वाहतुकीसाठी खुला होईल.
– डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार.

आपली प्रतिक्रिया द्या