माथाडी, जनरल कामगार सेनेकडून डॉक्टरांचा सन्मान

388

कोरोना रोखण्यासाठी अहोरात्र झटणार्‍या डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी हिंदुस्थान माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या वतीने सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांचा गौरव करून सॅनिटायझरचे वाटपही करण्यात आले. अध्यक्ष विकास मयेकर यांनी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. आकाश खोब्रागडे, निवासी डॉक्टर गोकुळ यांचा सत्कार केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलेले रुग्णालयातील कर्तव्यदक्ष टेनिफोन ऑपरेटर राजू चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे शंकर झोरे, सुरेश कोळी, भानुदास राऊत, संदीप नलावडे, आशीष हातणकर, मंगेश आंग्रे, संदीप चिकले, कृष्णा खेडेकर, शंकर नायडू आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या