स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना शाखा क्र. 23 पोईसर, कांदिवली पूर्व यांच्या विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त गुरुवार 14 एप्रिल रोजी सायं. 7 ते 9 या वेळेत रात्री स्पर्धा परीक्षा शिबीर व करीअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे विविध खात्यांमधील जाहीर होणाऱ्या पदांच्या मेगा भरतीसंदर्भात 10 वी, 12 वी व पदवी परीक्षेनंतर काय? त्याचप्रमाणे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे मार्गदर्शन शिबिर विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आहे. स्पर्धा परीक्षांचे तज्ञ व्याख्याते प्राध्यापक संजय मोरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचे आयोजन शिवसेना शाखा क्र. 23चे शाखाप्रमुख संजय मांजरे यांनी केले आहे.