कंगना वुमन कार्ड खेळतेय- सोनु सूदचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

कंगना रनौतचा मणिकर्णिका प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकार करणाऱ्या सोनु सूद यांनी चित्रपट अर्ध्यावरच सोडल्याने कंगनाने सोनुवर टीका केली होती. सोनुकडे वेळ नाही आणि तो महिला दिग्दर्शकासोबत काम करू शकत नसल्यानेच त्याने चित्रपट अर्ध्यावर सोडल्याचे कंगना म्हणाली होती. त्यावर कंगना वुमन कार्ड खेळत असल्याचा हल्ला सोनुने केला आहे. मी महिला दिग्दर्शकासोबत काम करू शकत नाही, यात काहीच तथ्थ नाही. मी फराह खानसोबत हॅप्पी न्यू इयर मध्ये काम केले आहे.

कंगनाची आणि माझी चांगली मैत्री आहे. ती कायम राहील. मात्र, मला चित्रपटासाठी वेळ नसल्याने मला चित्रपट सोडावा लागत आहे. मात्र, कंगनाने वुमन कार्ड खेळू नये. त्यामुळे गैरसमज पसरतात. आता माझा रोल जिशान अयूब करणार आहे. चित्रपटात सोनु सदाशिवराव नारायण यांची भूमिका साकारत होता. जवळपास सर्व चित्रीकरण पूर्ण झाल्यावर सोनुने चित्रपट सोडल्याने आता जिशान बरोबर पुन्हा चित्रीकरण करावे लागणार असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडणार आहे. २६ जानेवारी २०१९ मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार होता.

सोनुकडे चित्रीकरणासाठी वेळच नाही. तो सध्या सिम्बाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. इतर कलाकारांसोबत त्याच्या तारखा जुळत नसल्याचे चित्रीकरण रखडले आहे. सर्व टीमला माझ्यावर विश्वास आहे. मात्र, सोनु माझ्यावर विश्वास ठेवत नाही. महिला दिग्दर्शकासोबत तो काम करू शकत नसल्याचे कंगनाने म्हटले होते. तसेच त्याची वेळेची अडचण असेलही मात्र, त्याच्या अडेलतट्टूपणामुळे त्याला बदलण्याचा निर्णय घ्याला लागल्याचे कंगना म्हणाली होती.

कंगना अनेकांच्या भूमिकेत हस्तक्षेप करत होती. तसेच काहींचे रोल कट करून मनमानी पद्धतीने तिचे चित्रीकरण सुरू होते. सिम्बासाठी सोनुला दाढी वाढवायची होती. तर या चित्रपटासाठी त्याला दाढी काढावी लागत होती. अखेरच्या क्षणी कंगना सोनुला तारखा बदलण्यास सांगत होती. त्यामुळे नाइलाजाने त्याने चित्रपट सोडल्याचे सोनुच्या सहकाऱ्यांनी सांगितले.