
अभिनेत्री कंगना रनौतची बहिण रंगोली चंडेल ही प्रत्येक वादात कंगनाच्या मागे ठामपणे उभी असते. कंगनासाठी कोणत्याही व्यक्तीशी लढा द्यायला तयार असलेली रंगोली ही आजही तिच्या आयुष्यातील एका वाईट प्रसंगाशी लढा देत आहे. रंगोलीवर काही वर्षांपूर्वी तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका व्यक्तीने अॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्याच्या दु:खद आठवणी रंगोलीने आज ट्विटरवर शेअर केला आहे.
Lot of people feeling sorry about the fact that I lost my beauty, honestly when your organs melt before your eyes beauty is the last thing you care about, even after 54 surgeries over a span of 5 years doctors couldn’t reconstruct my ear…(contd) pic.twitter.com/M5MMHVHpOx
— Rangoli Chandel (@Rangoli_A) October 2, 2019
(Contd)…..I had lost one eye had a retina transplant, doctors took skin patches from all over my body and grafted my one breast which was severely damaged, during breast feeding Prithu I felt many complications….(contd)
— Rangoli Chandel (@Rangoli_A) October 2, 2019
रंगोलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यात तिचा चेहरा, हाता खांद्या जवळील डावा भाग भाजला गेला होता. डावा कान वितळला होता. त्यानंतर गेल्या पाच वर्षात तिच्यावर तब्बल 54 शस्त्रक्रीया झाल्या आहेत. मात्र इतक्या शस्त्रक्रीया होऊनही डॉक्टर रंगोलीचा कान पुन्हा पूर्वीसारखा करू शकले नाहीत. रंगोलीने याबाबत ट्विट करत तिचे दु:ख मांडले आहे.
(contd)….even now I can’t stretch my neck sometime itching in grafted skin is so bad that I wish I was dead… shockingly acid victims numbers are very high in India, the culprit was out on bail within few weeks, it was too painful to see him roam around freely…(contd)
— Rangoli Chandel (@Rangoli_A) October 2, 2019
(Contd)..I stopped following the case, why not death sentence for these people? Beauty was the last thing I cared about I was university topper but best years of my youth went in operation theatres, even though I had 90 percent burn still no reservation for acid survivors (contd)
— Rangoli Chandel (@Rangoli_A) October 2, 2019
‘मी या हल्ल्यात माझं सौंदर्य गमावलं यासाठी अनेकजणांना वाईट वाटतं. पण खरं सांगू तर डोळ्यादेखत आपले अवयव वितळताना बघताना सौंदर्य ही शेवटची गोष्ट आहे ज्याचा तुम्ही विचार करता. पाच वर्ष, 54 शस्त्रक्रीयांनंतरही डॉक्टर माझा कान पूर्वीसारखा करू शकले नाही… एका डोळ्याचे रेटीना ट्रान्सप्लांट झाले आहे. डॉक्टरांनी शरीरातील सर्व भागातून त्वचा काढून माझा एक स्तन पूर्ववत करण्यात आला आहे. माझ्या मुलाला स्तनपान करताना मला खूप अडचणींना सामोरे जावे लागले. आजही मी माझी मान जास्त ताणू शकत नाही. ज्या ज्या ठिकाणी नवी त्वचा बसवली आहे तिथे कधीकधी एवढी खाज उठते की असं वाटतं की मी मेले असते तर बरं झालं असतं’, असे ट्विट रंगोलीने केले आहे.
(Contd)…. Why ?? These are some of the questions we need to ask ourselves and our system
— Rangoli Chandel (@Rangoli_A) October 2, 2019
‘आपल्या देशात अॅसिड हल्ले मोठ्या प्रमाणात होतात. मात्र त्या मुलींवर हल्ले करणारे आजही खुलेआम फिरत आहेत. त्यांना असे फिरताना पाहून फार दु:ख होतं. अशा नराधमांना फाशीची शिक्षा का नाही दिली जात? मी माझ्या विद्यापीठातील टॉपर होते. पण माझी महत्त्वाची वर्ष ऑपरेशन थिएटरमध्ये गेली. मी या हल्ल्यात 90 टक्के भाजले होते. तरिही मला कोणत्याही प्रकारचे आरक्षण देण्यात आलेले नाही. असे का? हे असे काही प्रश्न आहेत जे आपण समाजाला विचारायला हवेत’, असे देखील तिने या ट्विटमध्ये म्हटले आहे.



























































