
भाजपवाले मला सारखे देशद्रोही म्हणत राहिले तर खबरदार! एक दिवस मीच भाजपात जाईन, असा जबरदस्त टोला सीपीआयचे ‘स्टार प्रचारक’ कन्हैय्याकुमार यांनी लगावला आहे.
कन्हैय्याकुमार यांची सोमवारी बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील बखरी विधानसभा मतदारसंघात सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपची खिल्ली उडविली. जो भाजपवर टीका करतो त्याला भाजपवाले देशद्रोही म्हणतात. ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये होते तेव्हा भाजपवाले त्यांना खराब माणुस म्हणायचे. मग ज्योतिरादित्य भाजपात गेले तेव्हापासून भाजपवाले त्यांचे कौतुक करत आहेत. मला भाजपवाले देशद्रोही म्हणतात. सातत्याने मला देशद्रोही म्हणाल तर मी भाजपमध्ये जॉईन होईल असे कन्हैय्याकुमार म्हणताच सभेमध्ये हंशा उसळला.





















































