पोलिसांना धमकावणारे कणकवलीचे नगराध्यक्ष मोकाट, गुन्हा दाखल होऊनही अटक नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दिवसांपूर्वी थेट पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांना धमकावणारे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांचे बगलबच्चे आजही शहरात खुलेआम मोकाट फिरत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल केले खरे, पण त्यांना अद्यापि अटक न झाल्याने शहरवासीयांमध्ये तीक्र संताप व्यक्त होत आहे.

जावेद शेख या इसमाला लॉक डाऊन काळात घरी जाण्यास बजावणाऱया पोलिसावर जावेद धावून गेला होता. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ही बातमी समजताच नगराध्यक्ष समीर नलावडे, संदीप नाईक, अबिद नाईक यांनी कणकवली पोलीस ठाण्यात घुसून धूमशान घातले. चौकात या तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी जावेद शेखसह या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल केले. मात्र अद्यापि त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यावर विविध स्वरूपाचे 24 गुन्हे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आता लॉक डाऊनच्या काळात त्यांनी केलेले कृत्य अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी कणकवलीतूनच होत आहे.