कानडी साहित्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, बानु मुश्ताक यांच्या Heart Lamp कथा संग्रहाला बुकर पुरस्कार

लेखिका, कार्यकर्त्या आणि वकील बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅम्प या कथा संग्रहाला आंतराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या लेखिका आहेत. लंडनच्या एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्विकारताना मुश्ताक यांच्यासोबत अनुवादक दीपा भस्तीही उपस्थित होत्या. दीपा यांनी बानू यांच्या कानडी कथा संग्रहाचे भाषांतर इंग्रजीत केले होते. हा विविधतेचा विजय आहे अशी प्रतिक्रिया बानू मुश्ताक यांनी दिली आहे.

हार्ट लॅम्पमध्ये 12 कथांचा समावेश असून या कथा 1990 ते 2023 दरम्यान लिहिल्या गेल्या आहेत. दक्षिण हिंदुस्थानात पितृसत्ताक पद्धतीत राहणाऱ्या महिलांची हिंमत, बंड, विनोद आणि आपसात असलेल्या नात्यांवर आधारित आहे. या कथा कानडी संस्कृतीतल्या मौखिक पंरपरेतून आल्या आहेत.