कानपूर महामार्गावर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कानपूर-सागर राष्ट्रीय मार्गावर दोन वाहनांची टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून 11 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

ही टक्कर इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या ठिकऱ्या उडाल्या. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नेमक्या कुणाच्या चुकीमुळे हा अपघात झाला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.