‘कांतारा चॅप्टर 1’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार वाटचाल

‘कांतारा चॅप्टर 1’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व दाखवले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 61.85 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली. दुसर्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडी घट झाली असली तरी दुसर्या दिवसाची कमाई 43.65 कोटी इतकी होती. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाचे कलेक्शन 105.5 कोटी पर्यंत पोहोचले ‘सॅकनिल्क’च्या अहवालानुसार चित्रपटाने तिसर्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली. ‘कांतारा चॅप्टर 1’ची देशातील कमाई 162.85 कोटींवर पोहोचली आहे; तर जगभरातील कमाई 250 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.