‘कांतारा’ सिनेमाच्या प्रीक्वेलची घोषणा, ‘या’ दिवशी येणार ‘कांतारा चॅप्टर 1’ चे फर्स्ट लूक

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ या सिनेमाने त्याच्या अनोख्या कथेमुळे सर्वांचेच लक्ष वेधले आणि या सिनेमाला जगभरात यश मिळाले. होमबाले फिल्म्सचा अॅक्शन थ्रीलर ‘कांतारा’ सिनेमाच्या यशानंतर आता या सिनेमाचा प्रीक्वेल येणार आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद लक्षात घेता सिनेनिर्मात्यांनी ‘कांतारा’ सिनेमाच्या प्रीक्वेलची घोषणा केली असून या सिनेमाचे ‘कांतारा चॅप्टर 1’ असे नाव असणार आहे.

‘कांतारा’ सिनेमाच्या प्रीक्वेलची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली आहे. निर्मात्यांनी याच्या फर्स्ट लूक रिलीजबाबत अपडेट देत सांगितले, हा सिनेमा हिंदी, तामिळ, कन्नज, मल्ल्याळम, बंगाली आणि इंग्रजीमध्ये रिलीज होणार आहे.  पुढे सिनेनिर्मात्याने लिहीलेय, आता सिनेमातील कथा भूतकाळातील असणार आहे. हे एक दर्शन आहे. कांतारा सिनेमचा इंटेन्स क्लायमॅक्सचे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते आणि ऋषभ शेट्टी यांचा कधी न पाहिलाला अवतार पाहून सगळेच थक्क झाले होते. क्लायमॅक्सच्या आधी 25 मिनीटांच्या लांबलचक सीक्वेन्सने हिंदुस्थानी सिनेमांचा बेंचमार्क मोठा केला आणि प्रीक्वेल आल्याने आता लोकांच्या आशा आणखी वाढल्या आहेत.

‘कांतारा’ सिनेमाचा फर्स्ट लूक 27 नोव्हेंबरला दुपारी 12:25 रिलीज करण्यात येणार आहे. या सिनेमासाठी एक मोठा आणि दर्जेदार सेट तयार केला जात आहे, जिथे अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी, निर्माता विजय किरगांडूर, कलाकार आणि क्रू उपस्थित असतील. मुहूर्त पूजेनंतर निर्माते डिसेंबरमध्ये सिनेमाचे मुख्य फोटोग्राफी सुरू करतील आणि उर्वरित कलाकारांची देखील घोषणा केली जाईल.