राहुल यांच्या राजीनाम्याने काँग्रेस सैरभैर, आता उशिर नको! ज्येष्ठ नेत्याचे सूचक वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीमध्ये दारूण पराभव झाल्याने निराश झालेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस सैरभैर झाली असून विविध नेत्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. यावर ज्येष्ठ नेते कर्ण सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. सोमवारी त्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीबाबत वक्तव्य केले.

काँग्रेस सरकारवर दोन राज्यात संकट; तीन राज्यात निर्नायकी अवस्था

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस भरकटली असून संभ्रमावस्थेत आहे. काँग्रेसची ही स्थिती पाहून मी चिंतेत आहे. राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्ष पद सोडण्याच्या साहसाची प्रशंसा करण्याऐवजी एक महिन्यापेक्षा जास्त वेळ त्यांचा राजीनामा परत घेण्यासाठी वाया घालवला आहे, अशा शब्दात कर्ण सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ नेत्याने आता काँग्रेस कार्यकारिणीला लवकरात लवकर बैठक बोलावून निर्णय घ्यायला हवा असाही सल्ला दिला आहे.

कर्ण सिंह पुढे म्हणाले की, राहुल गांधींच्या राजीनाम्यामुळे पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. निर्णय घेण्यास जेवढा वेळ घेतला जाईल तेवढे कार्यकर्ते आणि देशातील काँग्रेसचे मतदार नकारात्मक स्थितीत पोहोचतील. त्यामुळे उशिर करू नका आणि या नकारात्मक स्थितीवर लवकर मात करा. तसेच यावेळी राहुल गांधी हे बुद्धिमान व्यक्ती असल्याचे ते म्हणाले.