
कर्नाटकातील विजय हा जनताजनार्दनाचा आहे. आमच्या सर्व नेत्यांनी एकजुटीने काम केले आणि जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून मतदान केले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. सर्व नवनिर्वाचित आमदार बंगळुरूत येतील. पक्षाच्या वतीने निरीक्षक येतील. त्यानंतर नेता प्रक्रिया पूर्ण होईल, असे खरगे यांनी सांगितले.

























































