
कर्नाटकात 18 ते 25 वयोगटातील तब्बल 7,000 हून अधिक विद्यार्थी आणि तरुण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत कर्नाटक सरकारने आता राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी अभियांत्रिकी तसेच पदवी महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही तपासणी आणि समुपदेशन शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
18 ते 25 या महाविद्यालयीन वयोगटातील 7,000 हून अधिक तरुणांना एचआयव्हीचे निदान झाले आहे. यामुळेच कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्थेच्या शिफारशीनुसार, सरकारने थेट कॉलेज पॅम्पसवर जाऊन जनजागृती आणि स्वेच्छेने चाचणी मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.





























































