
सुपरस्टार आमीर खानचा ‘थ्री इडियट’ हा चित्रपट सर्वांनाच आठवत असेल. यात कॉलेजचे डीन वीरू सहस्रबुद्धे दोन्ही हातांनी लिखाण करताना दिसतात. अभिनेते बोमन इराणी यांनी साकारलेली ही भूमिका त्यावेळी प्रचंड गाजली. अगदी त्यांच्याप्रमाणेच मंगलोरमधील आदी स्वरूपा ही मुलगी एकाच वेळी दोन्ही हातांनी अगदी सहजतेने लिखाण करू शकते. वाचून आश्चर्य वाटलं ना…पण हे खरंय.
WOW!
Meet Aadi Swaroopa from India 🇮🇳 who can write with both hands simultaneously!She is an ambidexterity world record holder who can write in 10 unique ways including different languages like Kannada, English, Hindi, Tulu, Malayalam.
— Erik Solheim (@ErikSolheim) April 12, 2022
एरिक सोल्हेम नावाच्या एका ट्विटर युजरने तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत एक मुलगी दोन्ही हातांत खडू घेऊन फळ्यावर काहीतरी लिहिताना दिसतेय. कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलेय, ‘खूप छान! एकाचवेळी दोन्ही हातांनी लिहू शकणाऱया आदी स्वरूपा हिला भेटा! ती विश्वविक्रमधारक असून कन्नड, इंग्रजी, हिंदी, तुलू आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये 10 अद्वितीय पद्धतीने ती लिहू शकते.’ हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून तिच्या अनोख्या टॅलेंटचे नेटिझन्स भरभरून कौतुक करत आहेत.




























































