परिसरात विकास का झाला नाही? भाजप नेत्याला नागरिकांनी रोखून विचारला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही सोमन्ना यांना मंगळवारी निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्या मतदार संघात निवडणूक प्रचार करत असताना परिसरातील काही लोकांनी त्यांना अडवले आणि विकासाशी संबंधित प्रश्न विचारले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे कर्नाटकात भाजपने विकासाच्या नावाखाली जनतेच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते सिद्धरामय्या यांच्याविरोधात व्ही सोमन्ना कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमन्ना म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा मतदारसंघात प्रचार करत असताना लोकांनी त्यांना घेरले आणि परिसरात विकास का झाला नाही? असा प्रश्न विचारला.

नागरिक भाजप नेत्याला घेराव घालून मतदारसंघातील विकासाबाबत प्रश्न विचारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यावेळी म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा यांच्यासह भाजपचे अनेक नेते हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताना दिसले. ते लोकांना सोमन्ना आणि गावकऱ्यांमधील संभाषण रेकॉर्ड करू नका असे सांगतानाही दिसत आहेत.