
सामना ऑनलाईन । बंगळुरू
लग्नाची वरात असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच सजवलेली गाडी, बँड बाजा, त्याच्या तालावर नाचणारी वऱ्हाडी मंडळी.. पण या सगळ्याऐवजी जेसीबी वरातीत सामील झाला तर? हो, जेसीबी असलेली एक वरात चर्चेत आली आहे.
कर्नाटकातील पुत्तूरच्या संयातर गावातील चेतन नावाच्या जेसीबी मशीन ऑपरेटरने त्याच्या लग्नाची वरात चक्क गाडीतून किंवा चालत नाही तर जेबीसी मशीन मधून काढली. १८ जून रोजी विवाहानंतर तो बायकोला जेसीबीमधून घरी घेऊन गेला. या तरुणाला लग्न सोहळ्यात या जेसीबी मशीनचा सहभाग असावा असं त्याला वाटतं होतं. म्हणून त्यानं बायकोला या मशीनच्या केबीनमध्ये नाही तर खड्डा खणायच्या बकेटमध्ये बसवलं. या वरातीच्या जगावेगळ्या पद्धतीमुळे या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसंच या मशीनला फुलं व फुग्यांची सजावट करण्यात आली होती. त्यामुळं या दोघांच्या अशा या आगळ्यावेगळ्या पद्धतीच्या वरातीची चर्चा सर्वत्र सुरू आहे.


























































