Lok Sabha 2019 राहुल द्रविड मतदान करणार नाही, वाचा का ते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू द वॉल राहुल द्रविड यंदा मतदान करणार नसल्याचे समोर आले आहे. राहुल द्रविड हा कर्नाटकचा निवडणूक आयोगाचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे मात्र राहुलने मतदार यादीत त्याचे नाव नोंदवले नसल्यामुळे या वर्षी देखील तो मतदानाला मुकणार असल्याचे समोर आले आहे.

राहुल द्रविड हा आधी शांतीनगर लोकसभा मतदास संघात येणाऱ्या इंदिरानगरमध्ये राहायचा. त्यानंतर तो बंगळुरूतील आरएमव्ही एक्सटेन्शनमध्ये तो राहायला गेला. त्यामुळे त्याने शांतीनगर मतदारसंघातील यादीतून त्याचे नाव कमी करण्यासाठी अर्ज दिला होता.त्यानुसार तेथून त्याचे नाव रद्द करण्यात आले. बंगळुरूमध्ये नाव नोंदणी करण्याची तारिख 16 मार्च पर्यंत होती. मात्र राहुल द्रविडने त्याआधी त्याचे नाव न नोदंवल्याने त्याला मतदान करता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.