
सामान्य माणूसच हुकूमशहाचा पराभव करू शकतो हा विश्वास कर्नाटकच्या जनतेने देशाला दिला. त्याबद्दल त्या शहाण्या जनतेचे अभिनंदन!
‘देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. सामान्य माणूसच हुकूमशाहीचा पराभव करू शकतो हा विश्वास कर्नाटकच्या जनतेने देशाला दिला. त्याबद्दल त्या शहाण्या जनतेचे अभिनंदन,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकांना फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण आवडत नाही, शरद पवार यांचा भाजपवर निशाणा
‘कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंग बली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली व जिंकली. 2024 सालच्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका गांधी व राहुल गांधी यांचे खास अभिनंदन,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मोदी-शहा फेल, काँग्रेसला स्पष्ट बहुमत! बजरंग बली काँग्रेसला पावला, भाजपच्या टाळक्यात गदा


























































