
कर्नाटकच्या काँग्रेस-संयुक्त जनता दलाच्या 17 आमदारांना अपात्र ठरवल्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवार, 13 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने या प्रकरणावरील निकाल 25 ऑक्टोबरला राखून ठेवला आहे.
कर्नाटकमधील काँग्रेस आणि संयुक्त जनता दलाचे संयुक्त सरकार अल्पमतात यावे, यासाठी काँग्रेस-संयुक्त जनता दलाचे 17 आमदार गैरहजर राहिले होते. त्यामुळे काँग्रेस-संयुक्त जनता दलाचे सरकार कोसळले. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी या आमदारांवर कारवाई करत त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उद्या निर्णय दिला जाणार आहे.

























































