कर्नाटकला विजयासाठी 266 धावांची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्वथ कावेरप्पा आणि विजयकुमार वैशाखने बिनबाद 68 असलेल्या विदर्भचा दुसरा डाव 196 धावांत गुंडाळण्याची करामत केली. त्यामुळे पहिल्या डावात 174 धावांची आघाडी घेणाऱया विदर्भने कर्नाटकसमोर 371 धावांचे जबर आव्हान ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार मयंक अगरवाल (ना. 61) आणि रवीकुमार समर्थ (40) यांनी शतकी सलामी देत खणखणीत सुरुवात केली. त्यामुळे रणजी करंडकाच्या शेवटच्या दिवशी उपांत्य फेरी गाठण्यासाठी कर्नाटकला 268 धावांचे दिव्य गाठावे लागणार आहे.

शिवसेना विभाग क्र. 9, युवासेना (शीव कोळीवाडा विधानसभा) आणि अष्टविनायक क्रीडा मंडळ आयोजित कुमार गट आणि महिला गट स्पर्धेचे उद्घाटन करताना शिवसेना नेते आणि खासदार अनिल देसाई, वडाळा पूर्वेला गणेश नगरात सुरू झालेल्या या स्पर्धेला देसाईंनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, पद्मावती शिंदे, गोपाळ शेलार, शिवाजी गावडे, आनंद जाधव आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.