भाजपचे कमिशन सरकार, राहुल गांधी, सिद्धरामय्या, डीके यांना न्यायालयाचे समन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कॉँग्रेसने 40 टक्के कमिशन सरकार अशी जाहीरात प्रसिद्ध केली होती. याविरोधात भाजपने दिलेल्या तक्रारीवरून बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने कॉँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना समन्स जारी केले आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने कर्नाटकमधील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या होत्या. यामध्ये भाजप सरकार 40 टक्के कमिशन घेते आणि गेल्या 4 वर्षांत दीड लाख कोटींची लूट केल्याचा दावा केला होता. काँग्रेसचे हे दावे निराधार, पूर्वग्रहदूषित आणि बदनामीकारक आहेत. ज्यामुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली, अशी तक्रार कर्नाटक भाजप सचिव एस केशव प्रसाद यांनी केली होती. मानहानीच्या या प्रकरणात बंगळुरूच्या अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने हे समन्स जारी केले आहे. जबाब नोंदवण्यासाठी 27 जुलैची तारीख निश्चित केली आहे.