कर्तारपूर कॉरिडोर 9 नोव्हेंबरला उघडणार

409

हिंदुस्थानातील शीख भाविकांसाठी आपल्याकडील कर्तारपूर कॉरिडोर 9 नोव्हेंबरला उघडण्यात येणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी केली.

शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांच्या 550 व्या जयंतीसाठी हिंदू भाविकांना कर्तारपूर येथे जाण्याची इच्छा आहे. त्यासाठी शिखांचा पहिला गट 5 नोव्हेंबरला, तर दुसरा गट 6 नोव्हेंबरला रवाना होणार आहे. यासाठी रविवारपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील वातावरण तणावाचे असतानाच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुरदासपूर येथील डेरा बाबा मंदिरात 12 नोव्हेंबर रोजी नानक देव यांच्या दर्शनासाठी हिंदू भाविकांना व्हिसाशिवाय जाता यावे यासाठी दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच कर्तारपूर कॉरिडोर उघडण्याची महत्त्वाची घोषणा इम्रान खान यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या