उद्या कार्तिक पौर्णिमेला चंद्रग्रहण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2020 या वर्षाची सुरुवात ग्रहणाने झाली आणि आता सांगताही ग्रहणाने होणार आहे. या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण 30 नोव्हेंबर रोजी, कार्तिक पौर्णिमेला आहे. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. ही दोन्ही ग्रहणे हिंदुस्थानातून दिसणार नाहीत.

याविषयी अधिक माहिती देताना, खगोलअभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले, सोमवार, 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 5. 26 यावेळेत चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून जाणार असल्याने छायाकल्प चंद्रग्रहण होणार आहे. हे छायाकल्प चंद्रग्रहण उत्तर पूर्व युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आशियाच्या काही भागातून दिसणार आहे.

14 डिसेंबर रोजी या वर्षातील अखेरचे खग्रास सूर्यग्रहण रात्री 7. 03 ते 12-23 या वेळेत होणार आहे. खग्रास सूर्यग्रहण पॅसिफिक महासागर, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण भाग, आफ्रिकेचा दक्षिण पश्चिम भाग येथून दिसेल. चंद्र-सूर्यग्रहणे ही खगोलीय नैसर्गिक घटना असते. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे दा. पृ. सोमण यांनी स्पष्ट केले.