
विरोधकांना पूर्णपणे संपवायचं, त्यांना उद्ध्वस्त करायचं हाच अजेंडा घेऊन फडणवीस सातत्याने काम करत आहेत. लोकशाहीची हत्या कशी करायची ते फडणवीस यांच्याकडून शिकावं. आज सत्तेत असल्याने लोक त्यांना नमस्कार करतात, पण सत्ता गेल्यावर लोक त्यांना नमस्कारदेखील करणार नाहीत, अशी घणाघाती टीका नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी एका ऑनलाइन माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना केली.
फडणवीसांचं राजकारण कुरघोडीचं, दुश्मनीचं आणि दबावाचं राहिलेलं आहे. फडणवीसांच्या राजकारणाचा शेवट चांगला होणार नाही, फडणवीस भाजपला रसातळाला घेऊन जातील, असे धंगेकर म्हणाले.
शिस्तभंगाची कारवाई रोखण्यासाठी धावाधाव

























































