कश्मीरमध्ये नवीन बंकर्सची गरज, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची मागणी

पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी दिली. तसेच कश्मीरमध्ये नवीन बंकर्सची गरज असेही अब्दुल्ला म्हणाले.

मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले की, हिंदुस्थान पाकिस्तान तणावाच्या वेळी जम्मू कश्मीरमध्ये खुप नुकसान झालं आहे. राज्यात ज्यांच नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. राज्यात अनेक ठिकाणी अनेक वर्ष सामुदायिक बंकर्स वापरले गेले नव्हते. आता नवीन बंकर्सची गरज आहे. प्रत्येक घरांसाठी स्वतंत्र बंकर्स असावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत एक योजना तयार केली जाईल आणि केंद्र सरकारसोबत विचार विनिमय करून निर्णय घेतला जाईल. ही शस्त्रसंधी अशीच ठेवावी असेही अब्दुल्ला म्हणाले.