राज्य बँडमिंटन स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबईचा कौशल,तर महिलांमध्ये पुण्याच्या पुर्वाला विजेतेपद

राज्यस्तरीय बँडमिंटन स्पर्धेत रविवारी पुरुष एकरीचे विजेतेपद मुंबई उपनगरच्या कौशल धर्मामेर याने तर महिला एकरीचे विजेतेपद पुण्याच्या पूर्वा भावे हिने पटकावले. जिल्हा क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा शटल बँडमिंटन संघटनेच्या वतीने गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेल्या वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा व वैयक्तिक बँटमिंटन स्पर्धेत आज रविवारी पुरुष, महिला गटासह अन्य गटाच्या अंतिम फेरीचे सामने पार पडले.

पुरुष एकेरीत उपनगरच्या कौशल धर्मामेर याने पुण्याच्या आर्य भिवपथकी याचा सरळ सेटमध्ये २१-१४, २१-१४ असे दोन विरुध्द शुन्य डावाने पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर महिला एकेरीत पुण्याच्या पूर्वा बर्वे हिने आपल्याच जिल्ह्याच्या नेहा पंडीत हिच्यावर २१-११, २१-१९ अशी मात करून विजेतेपदावर नाव कोरले. पुरुष दुहेरीत ठाण्याच्या दिप रांभीया व विघ्नेश देवळेकर या जोडीने उपनगरच्या अक्षन शेट्टी व ठाण्याच्या प्रतिक रानडे या जोडीचा अवघ्या २६ मिनिटात २१-१३,२१-८ असा धुव्वा उडवून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. महिला दुहेरीत नागपुरच्या निकीता ठाकेर व ठाण्याच्या सिमरन सिंघी यांनी पुण्याची मानसी गाडगिळ व नागपुरच्या मृण्मयी सावजी या जोडीचा २१-१०, २१-१२ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर मिश्र दुहेरीत उपनगरच्या अक्षण शेट्टी व नागपुरच्या राशी लांबे या दुकलीने ठाण्याच्या दिप रांभीया व उपनगरच्या पुजा देवळेकर या जोडीचा १३-२१, २१-१८, २१-१९ असा अटीतटीच्या लढतीत पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरु डॉ. अशोक ढवण, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, मनपाचे सभागृह नेते भगवान वाघमारे, जाकेरलाला, भाजपाच्या मंगल मुदगलकर, राज्य बँडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष आशिष वाजपेयी, सचिव सुंदर शेट्टी, राजन पिल्लई, अभय शहा, नंदकुमार अवचार,फैजुल्लाा पठाण, सभापती सुनिल देशमुख, क्रिडा अधिकारी कलिमोद्दीन फारुखी, नगरसेवक प्रशास ठाकूर, नगरसेवक अँड. अमोल पाथ्रीकर यांच्यासह जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विजय जामकर, सचिव रवींद्र पतंगे-देशमुख आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या, उपविजेच्या खेळाडूंना करंडक व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यशस्वीतेसाठी संघटनेचे सचिन अंबिलवादे, पांडूरंग कोकड, सुधीर मांगुळकर, आशिष शहा, उन्मेश गाडेकर, नरेंद्र झांजरी, सागर पातुरकर, रवि लड्डा, विनोद जेठवाणी, इंद्रजीत वरपुडकर, विकास जोशी आदींनी पुढाकार घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या