विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कवठे येमाई

शिरूर तालुक्यातील फाकटे गावात गावडे वस्तीजवळ भक्षाच्या शोधात आलेला एक बिबट्या आज पहाटेच्या सुमारास विहिरीत पडला. याबद्दल कळताच जुन्नर,शिरूर वन विभागाच्या पथकाने विहीरीत पिंजरा सोडला व बिबट्याला सुखरुप बाहेर काढले.

रामदास काशिनाथ भालेकर हे विहीरीजवळून जात असताना त्यांना गुरगुरण्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी लगेचच स्थानिकांना आणि वन विभागाला बिबट्या विहीरीत पडल्याचे कळवले. त्यानंतर माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय देशमुख,त्यांची रेस्क्यू टीम व शिरूर वन विभागाच्या वनपाल सी ए काटे यांच्या टीमने आज रविवारी सकाळी 11 च्या दरम्यान विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढले.वन विभागाने केलेल्या या बिबट्या बचाव कार्याचे फाकटे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.