कझाकिस्तानात विमान दुमजली इमारतीला धडकले ;14 ठार, 35जखमी

594

कझाकिस्तानात आज शुक्रवारी भयंकर विमान अपघात घडला. बेक एअर फ्लाइट 2100 हे विमान दुमजली इमारतीला धडकले. विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर लगेचच पायलटचे नियंत्रण सुटल्याने विमानाला अपघात झाल्याचे ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 35 हून अधिक प्रवासी जखमी झाले. विमानात क्रू मेंबरसह 100 प्रवासी होते.  ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हे विमान कझाकिस्तानच्या अलमटी येथून नूर सुल्तान या ठिकाणी निघाले होते. या विमानात बिघाड झाल्यामुळे ते इमारतीला धडकल्याचे काही वृत्तसस्थांनी म्हटले आहे. परंतु विमान कंपनीने हे वृत्त फेटाळून लावले आहे. अपघातातून वाचवण्यात आलेल्यांमध्ये 8 मुलांचा समावेश आहे. कझाकिस्तानचे राष्ट्रपती कासम जोमार्ट यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या