
छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’ च्या 14 व्या पर्वाचे शूटींग संपले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी ही माहिती ब्लॉगच्या माध्यमातून दिली. त्यांनी या कार्यक्रमाच्या सेटवरचे फोटोही शेअर केले.
अमिताभ यांनी लिहिलंय, शोचा शेवटचा दिवस… ‘केबीसी’ शो तयार करण्यासाठी मेहनत करणाऱया सर्वांचे धन्यवाद… निरोप घेतो… आशा करतो की, नवीन वर्षात पुन्हा भेटूया.
‘सोनी एन्टरटेन्मेंट’ वाहिनीवर ऑगस्ट महिन्यात ‘केबीसी’ शो सुरू झाला होता. हा शो या महिन्याअखेरीस संपेल. 2000 सालापासून अमिताभ या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. यादरम्यान फक्त शाहरुख खान याने 2007 साली या शोचे सूत्रसंचालन केले होते.



























































