केदारनाथमध्ये भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, सहा जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केदारनाथमध्ये भाविकांना घेऊन जाणारे एक हेलिकॉप्टर कोसळले असून यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर आरएम कंपनीचे असल्याचे समजते. दुर्घटनेबाबत समजताच एक बचावपथक घटनास्थळासाठी रवाना झाले आहे. केदारनाथमध्ये आज दाट धुके होते. या धुक्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मृतांमध्ये दोन वैमानिकांचा समावेश आहे.