चिथावणीखोर भाषणांवर नजर ठेवण्याचे निर्देश

 

चिथावणीखोर भाषणे पूर्णपणे अस्वीकार्ह असून भविष्यात हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी एक यंत्रणा गरजेची आहे. विविध समुदायांमध्ये सुसंवाद आणि सलोखा राखण्यासाठी आणि चिथावणीखोर भाषणांवर नजर ठेवण्यासाठी समिती तयार करा, असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले.  चिथावणीखोर भाषणांना आळा बसावा यादृष्टीने रॅलींवर बंदी घालण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालण्यास नकार दिला.